vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरितावेळापत्रकात दि.15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरितावेळापत्रकात दि.15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

रायगड-अलिबाग( प्रतिनिधी:- शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता वेळापत्रकात दि.15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी दिली आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार (OBC/SBC/VJNT/NT-A,B,D) व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत (NT-C) 12 वी नंतर सन 2026-27 या वर्षातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmasnew.mahait.org, राबविण्यासाठी वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यवसायिक विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचण येत असल्यास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

0000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हाधिकारी म्हणुन आशिमा मित्तल यांनी स्विकारला पदभार…

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय” प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ