vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठचे अलिबाग शहरात आयोजन नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन नव ऊद्योजकांना प्रोत्साहित करावे

अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठचे अलिबाग शहरात आयोजन नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन नव ऊद्योजकांना प्रोत्साहित करावे

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:-“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ -थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम शुक्रवार, दि.02 ऑक्टोबर, शनिवार, दि.03 ऑक्टोबर आणि रविवार,दि.04 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हॉटेल व्हेवज, टिळक रोड, अलिबाग येथे संपन्न होणार असून सकाळी 10 वा. ते रात्री 9 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली असणार आहे.अलिबागमधील नागरिकांनी अमृतपेठ थेट बाजारपेठ येथे सहकुटुंब भेट देऊन नव ऊद्योजकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी केले आहे.

“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील हॉटेल व्हेवज, टिळक रोड अलिबाग येथे” संपन्न होत आहे. रायगड जिल्ह्यातील लघुउद्योजकाना व नगरिकांनी अमृतपेठ थेट बाजारपेठ अलिबाग येथे सहकुटुंब भेट देऊन नव उद्योजकांना प्रोत्साहित करावे. महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, लघुउद्योगाला चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक लघु उद्योजक,लक्षित गटातील विविध व्यवसायीक प्रशिक्षणे घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, विक्री कौशल्य वाढावे याकरिता व्यवस्थापकीय संचालक (अमृत) यांची संकल्पना असलेली अलिबाग अमृत पेठ थेटबाजारपेठ चे आयोजन केले आहे. हॉटेल व्हेवज, टिळक रोड अलिबाग येथे अमृत पेठ शुक्रवार ते रविवार म्हणजे शुक्रवार, दि.2 ऑक्टोबर, शनिवार, दि.3 ऑक्टोबर आणि रविवार,दि.4 ऑक्टोबर 2026 याकालावधीत होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत बाजारपेठ खुली असणार आहे

आधिक माहिती साठी संपर्क :-रायगड जिल्हा व्यवस्थापक 9112228759,श्री शैलेश मराठे 9423892182,कु मंगेश ढेबे 8149552143

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, ठाणे-*अनधिकृत शाळांपासून सावधान; मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या – शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे*

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

vishwatmaklokswamivarta

दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !**अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?* – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक कार्यवाही

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर-नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी खास सुविधा

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी