
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही..
जालना, प्रतिनिधी :- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तणल यांनी जारी केले आहेत.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या सार्वत्रीक निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षांशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांचेकडून होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती प्रदर्शीत करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी कालावधी संपल्यानंतर इमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यकआहे.
*-*-*-*-स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाची कार्यपध्दती..
जालना, प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये शक्तीचा वापर करुन निवडणूकीचे कालावधीत जालना जिल्हयात परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांची निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या/वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100मीटर परिसरात तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याळ कार्यालयाचे अवारात फक्ति उमेदवार, सूचक/अनूमोदक अथवा दोन व्यरक्तीस यांना परवानगी दिली जाईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये अंमलात राहतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तरल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध..
जालना, प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या कार्यकर्ते व हितचिंतकाने, मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी मा.निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. मा.निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तमल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध…
जालना, प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तिल यांनी जारी केले आहेत.
*-*-*-*-
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
जालना, प्रतिनिधी:- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तूल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध
जालना, प्रतिनिधी:- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारफेरी/ मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्त्ल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेवर निर्बंध
जालना, प्रतिनिधी:- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पाडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तील यांनी जारी केले आहेत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. सदर वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. सदर वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध
जालना, प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तिल यांनी जारी केले आहेत. ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.
*-*-*-*-स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,रहदारीस अडथळा निर्माण करण्यास निर्बंध
जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तिल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध .
जालना, प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगर परिषदांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदिसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगीशिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्त ल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-



