vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याकामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा..

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याकामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्राधिकरणाच्या विविध क्षेत्रामध्ये नियोजनाच्या दृष्टीकोनातून करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित यंत्रणेला याबाबतची कार्यवाही विहित कालमर्यादेत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीवेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीसकर, नगर प्रशासन विभागाचे उपायुक्त देविदास टेकाळे, सह महानियोजनकार रवींद्र जायभाय, तहसीलदार सुनंदा पारवे, उपमुख्यलेखाधिकारी व वित्त अधिकारी साधना बांगर, सहायक संचालक सुमित मोरावकर यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.पापळकर म्हणाले, औद्योगिक व वाणिज्य वापर सुरू असलेल्या प्रदेशात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पथक स्थापन करावे. स्थापन केलेल्या पथकाने क्षेत्रीय दौरे करून अतिक्रमण धारकांना कायद्यातील तरतूदीनुसार नोटीसा बजावून केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल सादर करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमीनींची नियमितपणे स्थळ पाहणी करून या जमिनीवरील अतिक्रमण, अवैध उत्खनन, सांडपाणी, घनकचरा इत्यादीबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महानगर आयुक्त श्री.पापळकर यांनी प्राधिकरणाच्या विभागनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करून विहित मुदतीत कार्यवाही करा अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. नियोजन, अतिक्रमण, जमीन मालमत्ता, तसेच आस्थापना विभागाचा आढावा घेण्यात आला यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा !* – हिंदु जनजागृती समितीची पुणे व अहिल्यानगर येथील आंदोलनाद्वारे मागणी** आतंकवाद आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही !*

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंधअत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट

vishwatmaklokswamivarta

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

vishwatmaklokswamivarta