vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

      अमरावती, प्रतिनिधी:महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने दिवाळी महोत्सवानिमित्त ‘मेळघाट हाट’, सायन्सस्कोर मैदान येथे भरविण्यात आलेल्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महोपात्र यांच्या हस्ते झाले. महिला बचत गटांनी तयार केलेला दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीमती संजीता महोपात्र यांनी केले.       महा एफ.पी.सी.संचालक सुधीर इंगळे, माविमचे विभागीय सल्लागार केशव पवार, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

     मेळाव्यात जिल्ह्यातील विविध महिला बचत गट यांच्याकडून हस्तनिर्मित उत्पादने, स्थानिक खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, सजावटीच्या वस्तू, कापड, सुगंधी अगरबत्ती, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकृती यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिलांच्या कष्टातून आणि कौशल्यातून घडविलेल्या या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरासाठी व दिवाळी भेटवस्तूसाठी महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची खरेदी करून ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला हातभार लावला आहे.

   महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 19 ऑक्टोबरपर्यंत मेळघाट हाट येथे भरविण्यात आलेल्या या दिवाळी विशेष विक्री व प्रदर्शनास भेट देवून महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून ‘आत्मनिर्भर महिला – सशक्त समाज’ हा संदेश दिला जाईल, असे आवाहन डॉ. रंजन वानखेडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय व्याख्यानमाला

vishwatmaklokswamivarta

धारावीकरांसाठी खुशखबर- सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा #पुनर्विकास करण्यात यावा.- प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

vishwatmaklokswamivarta