vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली, प्रतिनिधी : भारत इलेक्ट्रिसिटी परिषदेमधील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) आकर्षक व पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञान केंद्रित स्टॉलला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी स्टॉलला भेट देत महापारेषणच्या कार्याचे कौतुक केले.

नवी दिल्लीतील यशोभूमी, व्दारका येथे भरविण्यात आलेल्या या चार दिवसीय परिषदेत महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल उभारला होता. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली, संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल साकारण्यात आला.स्टॉलमध्ये महापारेषणची प्रगती, ध्येय-उद्दिष्टे, तसेच भविष्यातील २०३० पर्यंतचे नियोजन याबाबत डिजिटल माध्यमातून माहिती सादर करण्यात आली. ड्रोन आणि मोबाईल ॲप तंत्रज्ञानाव्दारे पारेषण वाहिनी पेट्रोलिंग, एमटीएएमसी सबस्टेशन ऑटोमेशन प्रणाली यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती अभ्यागतांना देण्यात आली. या स्टॉलला परिषदेत उल्लेखनीय भेटी मिळाल्या असून देश-विदेशातील प्रतिनिधींनी महापारेषणच्या तांत्रिक प्रगतीचे विशेष कौतुक केले.

विविध मान्यवरांच्या भेटी

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी., तेलंगणा साऊथ वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जितेश पाटील, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनी स्टॉलला भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही स्टॉलला भेट देत महापारेषणच्या नवतंत्रज्ञानाची प्रशंसा केली.

 

********

संबंधित पोस्ट

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग