vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा अंतर्गत कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार..

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा अंतर्गत कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार..

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा अंतर्गत कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याचे ठरले आहे. हा निर्णय म्हाडा प्राधिकरणाच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत मंजूर करण्यात आला.

म्हाडा कर्मचाऱ्यांना २०२४ मध्ये तेवीस हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. यंदा बोनस वाढवावा अशी मागणी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांकडून करण्यात आली होती. तसेच याबाबत प्राधिकरणाकडे अर्जही केला होता.

गुरुवारच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्राधिकरणाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शेवटी पंचवीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

म्हाडा प्राधिकरणाने स्पष्ट केले की, बोनसवाढ हा कर्मचाऱ्यांच्या कामातील उत्साह आणि प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे दिवाळीच्या सणाच्या काळात कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही आर्थिक दृष्ट्या लाभ घेऊ शकतील.

प्राधिकरणाने या निर्णयाबाबत सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे.

संबंधित पोस्ट

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग, दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

क्रेन मालकांनी वाहतूक नियंत्रण शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील*दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करणा-या इसमांवर कारवाई*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta