vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पर्यटन संचालनालयाच्या नवीन योजनांमुळे देश-विदेशी पर्यटकांना आता शहरातही मिळणार “टुरीस्ट होम”

पर्यटन संचालनालयाच्या नवीन योजनांमुळे देश-विदेशी पर्यटकांना आता शहरातही मिळणार “टुरीस्ट होम”….

सातारा प्रतिनिधी पर्यटन संचालनालयांतर्गत पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरीता विविध योजना राबविण्यात येतात. देश-विदेशातील पर्यटकांच्या निवास व्यवस्थेकरीता टुरीस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अर्पाटमेंट इत्यादी बाबतचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पर्यटन संचालनालय, पुणे विभागामार्फत नोंदणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या विभागातील नागरीकांनी तसेच पर्यटक व्यवसायिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पुणे विभागाच्या प्र. उपसंचालक श्रीमती शमा पवार यांनी केले आहे.

पर्यटन संचालनालय, मुंबईचे संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार नव्याने चालू केलेल्या टुरीस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अर्पाटमेंट या योजनेच्या माध्यामातून व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना शहारातील जीवनशैली, संस्कृती आणि परंपरा यांना जवळून अनुभवता येणार आहे. तसेच स्थानिक स्वयंपाक, मराठमोळे पाहुणचार व कुटुंबातील गप्पा गोष्टींमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक संस्मरणीय होईल. अधिक माहितीसाठी 8080035134 संपर्क क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

000

संबंधित पोस्ट

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान,लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिन योगसाधना हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…

🔥 उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदल 🚗