vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते

  सांगली, प्रतिनिधी : शासनाच्या जात पडताळणी शिबिराचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जात पडताळणी करून घ्यावी व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा जाती पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी केले. सांगली हायस्कूल सांगली येथे आयोजित जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते.

  शाळेचे उपप्राचार्य सी. एस.ऐनापुरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे विद्यार्थ्यांकरिता किती महत्त्वाचे आहे याबाबत माहिती दिली. तसेच शैक्षणिक दृष्ट्या व पुढील शिक्षणाकरिता जात प्रमाणपत्र काढून आपले शैक्षणिक नुकसान टाळावे, असे ते म्हणाले.

 समतादूत विक्रांत शिंदे व सविता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंदर्भात सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका यांचे निरसन करण्यात आले.

स्वागत मेघा आलासे यांनी केले. आभार सुशांत जाधव यांनी मानले. तसेच या कार्यक्रमासाठी सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले, उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले, संशोधन प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

समतादूत संयोगिता हेरकळ यांनी शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमास समतादूत सागर आढाव, अंकुश चव्हाण, शहाजी पाटील, संग्राम छत्रे, आबासाहेब भोसले व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ – मंत्री आदिती तटकरे

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…