vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

मुंबई: प्रतिनिधी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते. यावेळी एम. एम. आर.डी.ए. चे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गगल तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपो मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात चर्चा झाली. तसेच गायमुख ते फाऊंटन व गायमुख ते दहिसर चेक नाका दरम्यान होणाऱ्या 60 मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनाने चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! तसेच रस्त्याचे विभाजन मध्यभागापासून करण्यात यावे या प्रमुख मागण्या एम.एम.आर.डी.ए. प्रशासनाने मान्य केल्या.

याशिवाय डोंगरी कार शेड व तिथून होणाऱ्या रस्त्या संदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने व्हावा अशी मागणी केली. तसेच कार शेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या व ख्रिश्चन समुदायाचे श्रद्धास्थान असणाऱ्या ” फातिमा माता ” तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचे देखील निश्चित करण्यात आले.

यावेळी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून या संबंधित पिण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल, असे नियोजन करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी एम.एम.आर.डी.ए.चे अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमीपुत्र देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा समावेश…

vishwatmaklokswamivarta

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी ..

vishwatmaklokswamivarta

बदलापूर घटना : चकमक प्रकरणात ५ पोलीस दोषी, बंदुकीवर आरोपींच्या बोटांचे ठसे सापडले नाहीत…

vishwatmaklokswamivarta

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा*