vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडत आहेत. देशातील तसेच जगातील चांगल्या आणि सक्षम पोलीस दलांपैकी महाराष्ट्र पोलीस दल आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कुबुद्धीचे विसर्जन करा आणि सगळ्यांनाच सुबुद्धी येवो,’ अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शिस्त आणि पर्यावरणपूरकतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्सव साजरा केला आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून या उत्सवाचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमित साटम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासे, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव आणि प्रशांत सपकाळ, सहायक आयुक्त संतोष साळुंके तसेच विविध देशांचे भारतातील महावाणिज्यदूत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!

दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे : रामदास आठवलेंचे सूचक विधान*

vishwatmaklokswamivarta

आज पासूनमुंबई-कोकण जोडणारी Ro-Ro फेरी सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवर संयुक्त संसदीय समितीची घोषणा-` परकीय निधी नियमन’ कायद्यातील सुधारणा विधेयकावर समितीचे कामकाज  शिवसेना खासदार नरेश म्हस्के `एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवरील समितीवर

vishwatmaklokswamivarta