vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न* 

*लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न*

​सातारा प्रतिनिधी-महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व महिला व बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना बाल विकास नागरी प्रकल्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बीट-लोणंद येथे नव चेतना बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

​या मेळाव्यात महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्रामार्फत हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व तात्पुरत्या राहण्याची सोय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१, चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० या टोल फ्री क्रमांकांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.या प्रसंगी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र आणि बालविवाह प्रतिबंध कायदा या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम झाले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

​या कार्यक्रमास महिला सक्षमीकरण केंद्र विभागातील मृण्मयी जाधव, सोनाली देसाई, तनया घोरपडे , मानसी शिर्के, अंगणवाडी बीट, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta