vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर ७.५ हॉर्सपॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून वंचित राहत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सत्यजित देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केला. या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.

शिराळा (जि.सांगली) येथील काही शेतकऱ्यांनी वीज वापर जास्त दाखविल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी ५२ वीज जोडण्यांची स्थळ तपासणी करण्यात आली. या चौकशीत संबंधित शेतकऱ्यांना दिलेली वीज बिले योग्य असून त्यांचा प्रत्यक्ष वीज वापर अधिक असल्याचे आढळून आले आहे. सध्या या ग्राहकांसाठी स्वतंत्र विशेष दर लागू असून तो सर्वसाधारण दरापेक्षा वेगळा आहे. तरीही संबंधित ग्राहकांना आणखी काही दिलासा देता येऊ शकतो का, याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. कृषी पंपांचे वर्गीकरण हे महावितरणकडून नव्हे तर महाराष्ट्र वीज नियामक आयोग कडून निश्चित केले जाते. यासंदर्भात शेतीसाठी स्वतंत्र वर्गीकरणाचा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला होता; मात्र त्यास मान्यता मिळालेली नाही. तरीही यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे

संबंधित पोस्ट

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात

vishwatmaklokswamivarta

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्वासन…