vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज…

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज

 

        नवी मुंबई प्रतिनिधी –  नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 पदांकरिता एकूण 19,220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.21 व 22 जुलै 2026 या कालावधीत 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजिकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

          अमरावती जिल्ह्यात 1112, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2535, मुंबई जिल्ह्यात 8123, नागपूर जिल्ह्यात 948, नाशिक जिल्ह्यात 1783 व पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात एकूण 18,930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.

          सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ION) यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे.

          परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) दि.10 जुलै 2026 पासूनच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत, असे संदेश एसएमएस व ई मेलव्दारे पाठविण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रे घेऊन उमेदवारांनी आपल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

          सदर पदभरती परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यांचे तंतोतंत पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर नमूद वेळेवर उपस्थित राहावे, असे महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी, असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक. 

पद्म पुरस्कार २०२६ जाहीर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून #मेट्रो सेवा सुरू

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

vishwatmaklokswamivarta

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta