vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

मुंबई प्रतिनिधी- मुंबई तील साकीनाका खैराणे रोड येथे एक दुर्दैवी घटना घडली रस्त्यावर उघड्या असलेल्या मेन हॉल मध्ये एका पादचार्‍याचा पडून मृत्यू झाला आहे

प्राप्त माहितीनुसार मुंबईतील ट्राफिक जाम असलेला विभाग साकीनाका खैरानी रोड खैरानी रोडवर उघड्या असलेल्या या मेन हॉलचे सफाई चे काम सुरू असताना अर्धवट काम सोडून जागेवर कोणत्याही कर्मचारी नसताना रस्त्यावरून येणारा पादचारी मोबाईल वर बोलण्याच्या नादात उघड्या असलेल्या या मेन हॉलमध्ये दुर्दैवीपणे पडला आजूबाजूचे नागरिक त्या मेन होलकडील धावून वाचवण्याचा प्रयत्न केला असता नाल्याचा प्रवाह आणि उंची असल्याने नाल्याच्या प्रवाहात मेन हॉलमध्ये पडलेला व्यक्ती वाहून गेला

मुंबई शहरामध्ये पूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत असाच निघून गेला असता आता काही पावसाची जोरदार मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे ठिकठिकाणी पाणी साचले आहे रस्त्यावर पाणी साचले जात आहे तर काही ठिकाणी साचलेले पाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्य असलेले मेन हॉल नाल्याचे त्याचे झाकण काढण्यात येत आहे आणि त्याची देखरेख करण्यास कोणी नसल्याने अशा प्रकारे दुर्घटना समोर येत आह

पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे नागरिकांच्या सुरक्षेचे काय असे परिसरातील लोक म्हणत आहेत जर आल्याची सफाई पाणी चा निचरा करायचे असेल झाकण उघडे करायचे असेल तर तेथे माणूस उभा करावा लागतो जो येणारा जाणाऱ्या पादचाऱ्यांना माहिती देऊ शकतो की येथे झाकण उघडे आहे येथे धोका आहे परंतु असं न केल्याने पालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत

 दरम्यान घटनास्थळी, अग्निशामक दलाचे बचाव कार्य सुरू आहे यावेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी संबंधित दोषीवर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे वृत्त आहे साधारणतः नुकतीच चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडल्याची घटना घडली असताना अशाप्रकारे दुसरी घटना झाली असल्याने नागरिकात पालिका प्रशासनाच्या कामाचा आक्रोश निर्माण झालेला आहे

00000

संबंधित पोस्ट

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार,पुढील काही तास धोक्याचे 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले…

मालेगावात महापौर निवडणुकीनंतर मोठी दुर्घटना, मनपा सभागृहातील लिफ्ट अडकली

vishwatmaklokswamivarta