vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार’च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

‘स्वाधार’च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

अमरावती,दद प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन १६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत दुपारी ३ ते ५ या वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,अमरावती येथे करण्यात आले आहे

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ तांत्रिक त्रुटींमुळे किंवा कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी अमरावती समाज कल्याण विभागातर्फे याकार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या अर्जांचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना शैक्षणिक भत्ता मिळण्यास मदत होणार आहे.

शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, मात्र शासकीय वसतिगृहांची प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचा निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च सुसह्य व्हावा यासाठी शासन ‘स्वाधार’ योजनेअंतर्गत थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, ऑनलाइन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला, आधार लिंकिंग किंवा बँक खात्याच्या माहितीमध्ये झालेल्या चुकांमुळे अनेक अर्ज ‘Sent Back’ (परत) केले जातात. विद्यार्थ्यांची अडचण ओळखून समाज कल्याण विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटी जागेवरच तपासून त्या कशा दूर कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव रखडले आहेत, त्यांनी आपले मूळ कागदपत्रे, ऑनलाइन अर्जाची प्रत आणि लॉगिन आयडीसह या कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

मराठा क्रांती मोर्चा निमित्त 10 जानेवारी रोजी वाहतूक मार्गात बदल…

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना वापरासाठी रस्ते व पदपथ मोकळे मिळावेत याकरिता बेवारस वाहने व अनधिकृत फेरीवाले या विरोधात धडक मोहीम..