vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 ठाणे प्रतिनिधी  : सर्व सुधागड तालुका ठाणे शहर (जिल्हा) व उपनगर शहरवासी बंधू भगिनींना कळविण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या सुधागड तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना, दिव्यांग व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी व तरुणांचा गुणगौरव, ज्येष्ठ सामाजिक व्यक्तीचा सत्कार समारंभ रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी 5+267, रोटरी क्लब ठाणे, महानगर पालिका शाळा क्र. 19, विष्णु नगर, नौपाडा ठाणे (प.) येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.

आपली संस्था ठाणे शहर (जिल्हा) व सुधागड तालुका आणि रायगड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी कार्यरत आहे. संस्थेचे विस्तृत, जनहित व विद्यार्थी हितवर्धक कार्य सर्वदूर सर्वश्रुत आहे. आपल्या संस्थेने सुधागड तालुक्यातील विविध मुलभूत समाजोपयोगी आणि सार्वजनिक भौतिक सुधारणा व त्यांच्या आधुनिकीकरणासाठी सदैव आग्रही राहणारी संस्था म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आता संस्थेने ठाणे शहरात स्वमालकीचे बहुउद्देशीय सभागृह नक्की करून गरुडझेप घेतली आहे. अर्थात सर्व क्षेत्रातील समाजबांधव, दानशूर व्यक्ती व संस्था यांचे भक्कम पाठबळ व सहकार्य संस्थेला अभिप्रेत व अपेक्षित आहेच आणि ते मिळेल असा विश्वास अध्यक्ष घाडगे यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे शहरात वास्तव्यास असलेन्या सुधागड तालुक्यातील संबंधित विद्यार्थी, पालक व व्यक्तींनी शनिवार, 25 जुलै 2026 पर्यंत खालीलप्रमाणे आपली माहिती संस्थेच्या कार्यालयात द्यावी किंवा संस्थेच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी संपर्क साधावा.

कार्यालयाची वेळ:- मंगळवार, गुरुवार व शनिवार सायंकाळी 7.00 ते 9.00 वा.

1) मार्च 2026 माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व विशेष प्रावीण्य प्रशस्तीपत्र किंवा गुणपत्रिका. 2) विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत शैक्षणिक मदत मिळणेसाठी पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थी व पालकांनी अर्ज व माहीत देणे. 3) 7 वी ते 9 वी इयत्तेत किमान 4 विषयांत 2 व अधिक गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

शासन आणि युनिसेफमार्फत खेळ,चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

vishwatmaklokswamivarta