vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

जालना,  (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती हा सेवा पंधरवाडा दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने दिलेले सर्व कार्यक्रम महानगर जिल्ह्यात राबवून सेवा पंधरवाडा यशस्वी करा असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सेवा पंधरवाडा कार्यशाळा कार्यक्रमात बोलताना कार्यकर्त्यांना केले.

यावेळी व्यासपीठावर जालना विधानसभेचे माजी आमदार मा.कैलासजि गोरंटयाल, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, विजय कामड, सौ.विमलताई आगलावे, महानगर माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, सतीश जाधव, महानगर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, युवा नेते अक्षय गोरंटयाल, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे, वसंत शिंदे, धनराज काबलीये, अर्जुन गेही, माजी सरचिटणीस देविदास देशमुख इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हा व बूथ स्तरावर रक्तदान शिबीर, दि.१७ ते २४ सप्टेंबर आरोग्य शिबीर, दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी, १८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत रक्तदान शिबीर दुरसा टप्पा मंडळ स्तरावर घेणे, १९ व २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व प्रदर्शन तसेच पुस्तकाचे वितरण जिल्हा स्तरावर करायचे आहे. २२ ते २३ सप्टेंबर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेष पुष्पांजली तसेच एक पेड मा के नाम कार्यकर्त्यांच्या घरी स्नेह भोजन हा कार्यक्रम बूथ स्तरावर घेणे, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य विकसित भारत आत्मनिर्भर भारत हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेणे, त्यानंतर ओकल फॉर लोकल प्रचार प्रसार स्थानिक मेळाव्यांचे आयोजन म.न.पा. तसेच प.स. यांच्या माध्यमातून घेणे, २७ ते २८ सप्टेंबर जिल्हा स्तरावर मेरोथोन स्पर्धा, २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व खादी वस्तू खरेदी करणे हा स्वदेशीचा नारा देणे, २९ ऑगस्ट ते २५ डिसेंबर या वेळेत महानगर स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. इत्यादी कार्यक्रम घेऊन हा सेवा पंधरवडा कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.जालना महानगरात विक्रमी रक्त बॅग संकलित करणार – माजी आ.कैलास गोरंटयाल

यावेळी बोलताना माजी आ.कैलासजी गोरंटयाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी जालना महानगर मध्ये रक्तदान शिबीर घेऊन विक्रमी रक्त बॅग संकलित करण्यात येणार आहे व जालना महानगरात भाजपा लोकनेते मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे, मा.आ.बबनराव लोणीकर, मा.आ.नारायण कुचे, मा.आ.संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा पंधरवाडा आपण सर्वांनी यशस्वी करून दाखवावा असे आवाहन गोरंटयाल यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी सोपान पेंढारकर, चंपालाल भगत, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, ममता कोंड्याल, वर्षाताई ठाकूर, सुनील पवार, शिवादादा शेजूळ, सिद्धिविनायक मुळे, माजी नगरसेवक नंदकिशोर गरदास, राज स्वामी, महावीर ढक्का, बाबू मामा पवार, बजरंग राजपूत, अशोक पवार, गणेश जल्लेवार, सनी सामलेटी, संदीप नाईकवाडे, रमेश गौरक्षक, ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, बाबुराव भवर, महेंद्र अकोले, राजेंद्र भोसले, राजू गवई, सुहास मुंडे, सुमित सुरडकर, उमेश अग्रवाल, गजानन खरात, कृष्णा खिल्लारे, मुकेश चव्हाण, शिवराज जाधव, सतीश केरकळ, सरपंच काकासाहेब घुले, निवृत्ती लंके, विलास खरात, प्रदीप देठे, सिद्धेश्वर हाजबे, नागेश अंभोरे, सोमेश काबलीये, डोंगरसिंग साबळे, सुदर्शन काळे, शाम उगले, गौरव गोधेकर, इत्यादीसह जालना महानगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आजी-माजी न.प. जि.प. प.स.सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

vishwatmaklokswamivarta

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने