vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ऊसतोड कामागारांच्या पाल्यांना-संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन

ऊसतोड कामागारांच्या पाल्यांना-संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन

 

जालना, प्रतिनिधी: सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी संत भगवानबाबा वसतिगृह योजना राबविण्यात येते. यायोजनेअंतर्गत जिल्ह्यातील जालना, अंबड, मंठा, बदनापूर या ठिकाणी प्रत्येकी 2 मुलांचे 1 व मुलींचे 1 व घनसावंगी येथे मुलांचे 1 अशी एकुण 9 वसतिगृहे आहेत. या 9 वसतिगृहांची एकुण क्षमता 900 आहे.

शासकीय वसतिगृहांमध्ये इयत्ता 5 वी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशितांची निवास व भोजनाची मोफत सोय असते तसेच त्यांना आवश्यक असलेली वह्या, पुस्तके, शालेय स्टेशनरी इत्यादी सुविधा विनामुल्ये पुरविण्यात येते. जिल्हास्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा रु.600/- व तालुकास्तरावरी विद्यार्थ्यांना दरमहा रु. 500/- निर्वाहभत्ता देण्यात येतो. वसमिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थी ऊसतोड कामगाराचा पाल्य असावा.

संत भगवानबाबा मुलींचे वसतिगृह, जालना मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलांचे वसतिगृह, जालना मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलींचे वसतिगृह, अंबड मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलांचे वसतिगृह, अंबड, मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलींचे वसतिगृह, मंठा मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलांचे वसतिगृह, मंठा मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलींचे वसतिगृह, बदनापूर मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलांचे वसतिगृह, बदनापूर मान्य संख्या 100, संत भगवानबाबा मुलांचे वसतिगृह, घनसावंगी मान्य संख्या 100, या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या चालु शैक्षणिक वर्षात्‍प्रवेश घेण्यासठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना यादीमध्ये नमुद वसतिगृहाच्या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

आज होणार लोणार येथे योग महोत्सव बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन.

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन