vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी NIELIT संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी NIELIT संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम

ठाणे, प्रतिनिधी:- खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/ महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींच्या (ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार) विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या NIELIT या नामांकित प्रशिक्षण संस्थेद्वारे औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. याकरिता इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

प्रशिक्षणाचा तपशील:-बाब – Foundation Course in Information Security, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 90 Hrs, दिवस – 15 दिवस.

बाब – Cyber Security Assistant, विद्यार्थी संख्या -20 निवासी, कालावधी – 300 Hrs, दिवस – 50 दिवस.

बाब – Artificial Intelligent Assistant, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 300 Hrs, दिवस – 50 दिवस.

बाब – Certified Web Devloper, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 210 Hrs, दिवस – 35 दिवस.

बाब – Certified Data Analyst, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 240 Hrs, दिवस -40 दिवस.

बाब – Foundation Course In Machine Learning Using Python, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 90 Hrs, दिवस – 15 दिवस

बाब – Data Analysis With Python And SQL, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 120 Hrs, दिवस – 20 दिवस.

बाब – Drone Application Developer, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 540 hrs, दिवस – 90 दिवस

बाब – Internate Of Things (IOT) Assistant, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 300 Hrs, दिवस – 50 दिवस.

बाब – Foundation Course In VLSI Design, विद्यार्थी संख्या – 20 निवासी, कालावधी – 90 Hrs, दिवस – 15 दिवस. एकूण – विद्यार्थी संख्या – 200.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:-

1.अर्जदार लक्षित गटातील असावा. 2.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 3. अर्जदारच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रु.8 लाखांच्या आत असावे. 4. शैक्षणीक अहर्ता – अभियांत्रिकी पदविधारक (IT/Computer Science/Electronics/Telecommunications/Electrical/Instrumentation) अथवा B.Sc./B.S.A./B.C.S./M.Sc. (Computer Science)/M.C.A. इ. आनुषंगिक पदवीधारक. 5. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातिल असावा.

ब. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:-

1.आधार कार्ड. 2.अधिवास प्रमाणपत्र (Age Nationality & Domicile). 3.वरील अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा. (T.C./L.C.). 4.उत्पन्नाचे प्रमाणपत्र (रु.8 लक्षाच्या खालील) किंवा E.W.S. प्रमाणपत्र (2025-26). 5.शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र (अ मधील अनुक्रमांक 4 प्रमाणे).क. अर्ज कसा करावा:- NIELIT संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी गुगल लिंक देण्यात येणार आहे. त्यावर इच्छुक प्रशिक्षणार्थींची नाव नोंदणी केली जाईल. अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन आधार संलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी व संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील “योजना” या टॅबमध्ये जाऊन “NIELIT प्रशिक्षण योजना” या बटनवर क्लिक करून अर्जाची नोंदणी करावी.

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सोबत जोडले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.प्रशिक्षणाची सुरुवात जून 2025 मध्ये होणार असून हे प्रशिक्षण NIELIT संस्थेचे प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे घेण्यात येईल.अटी शर्ती:-

1. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. 2. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे, निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक अमृत, यांच्याकडे राहतील. 3.कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. 4.अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास info@mahaamrut.org.in या मेलवर अथवा मोबाइल क्र.9730151450 वर संपर्क करावा, तसेच NIELIT संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे अमृत, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी ‘ॲक्शन’ मोडवर,पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासनाला संयुक्त कारवाईचे दिले निर्देश..

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध-होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

vishwatmaklokswamivarta

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियान संयमाने वाहन चालविणे हीच खरी हिरोगिरी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन