vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक- मंत्री छगन भुजबळ· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक- मंत्री छगन भुजबळ· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

मुंबई, प्रतिनिधी : शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले असून राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे; तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरगुती गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना पुरवठा केला जात आहे. राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे; तसेच लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

 

0000

संबंधित पोस्ट

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️ ♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta