vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

        सांगली, प्रतिनिधी : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील 30 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 24 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व 30 पर्यटक सुरक्षित असल्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

     या पर्यटकामध्ये सांगली शहरातील 10, कडेगाव 5, पलूस 8, मिरज 7 असे एकूण 30 नागरिक आहेत. यामध्ये सांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे, अन्नपूर्णा भोसले, निशांद भोसले, रितेश जाधव, मनीषा जाधव, अलका जाधव व रिया जाधव, कडेगाव तालुक्यातील येडे येथील रामदास बाबर, सुर्यकांत कदम, दिपक अभंग, आप्पाजी सरगर व रामचंद्र जाधव, पलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड, मिरज शहरातील प्रमोद जगताप, वंदना जगताप, स्वरांजली जगताप, प्रांजली जगताप, विराज जगताप, फुलचंद शिंदे व हेमलता शिंदे यांचा समावेश आहे.

00000

संबंधित पोस्ट

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदानभविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – नितीन गडकरी..

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण