vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका पाच व अंगणवाडी मदतनीसच्या एका पदासाठी पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 18 जून 2025 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामीण या कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचे नाव व क्रमांक व रिक्त पद संख्या पुढीलप्रमाणे. बुधगाव 46 – 01 पद, समडोळी 20 – 01 पद, दुधगाव 64, 67 – 02 पदे, सांबरवाडी 122 – 01 पद आणि काकडवाडी 106 या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसचे एक पद रिक्त आहे.

  अटी व शर्ती – उमेदवाराचे वय दिनांक 18 जून 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 18 जून 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

मुंबईकरांसाठी खुशखबर म्हाडाच्या 2,640 घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, 6 ऑगस्टला पूर्ण होणारे हजारो अर्जदारांचे स्वप्न

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक – मंत्री शंभूराज देसाई

सामान्य नागरिकांना लवकर न्यायमिळण्यासाठीआवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न…