vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहेत. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही व्यक्तिस प्रवेश करण्यास, परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास , झेरॉक्स दुकाने सुरु ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र परीक्षा कालावधीत सुरु ठेवण्यास मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इ. जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.२४ जून ते दि.१६ जूलै या कालावधीत अंमलात राहतील असे आदेशात म्हटले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर मंगळवार, दिनांक 18 मार्च) रात्री पृथ्वीवर परतणार..

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन

नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि.25); 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta