vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांनी जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24 करिता अर्ज करावेत..

ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांनी जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24 करिता अर्ज करावेत..

ठाणे, प्रतिनिधी- जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. या पुरस्कारांतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्टनाका, ठाणे (प.) येथून प्राप्त करुन घ्यावेत.

या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि.30 जून 2025 पूर्वी अथवा पर्यंत आवश्यक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे बंद लिफाफ्यात सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- 022 25368755) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

बांद्राच्या एमआयजी मध्ये अवाच्या चालण्याच्या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी