vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

राज्य प्रतिनिधी -बुलडाणा, : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन भेट घेऊन संवाद साधला. पर्यटकांना घरी सुखरुप पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे.

जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे. मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते, लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते.

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत. हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज दि. 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले. पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे, असे पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल. आज दुपारी 3 वाजता जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार होतील. दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत. या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे

000000000

संबंधित पोस्ट

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

vishwatmaklokswamivarta

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भाजपाचे हिमंता बिसवा सर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चार मंत्र्यांचाही शपथविधी.