vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर

भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी): जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, आज प्रभाग क्रमांक १ मध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसरात भाजपच्या विजयाचा विश्वास निर्माण केला. या रॅलीमुळे जालना शहरात भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

ही भव्य रॅली चित्रकुट निवासस्थान येथून सुरू होऊन वरकड हॉस्पिटल, काटकर अप्पा यांचे घर, मुळे सर, शुक्ला सर, कान्हेरे सर, एखंडे पाटील यांचे घर, फाईन लिविंग, लामगे सर, देविदान रेसिडेन्सी, वाघचौरे किराणा, राधाकृष्ण मंदिर, दिपवाल सर, सुरा सर, म्हाडा ऑफिस, सेठी यांचे घर, अजित मानधने यांचे घर, पार्श्वभूमी कार्यालय, भाजपा कार्यालय व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे चौक येथे जाहीर सभेसाठी समाप्त झाली. रॅलीदरम्यान नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप जिंदाबाद ‘ कमळ निशाणीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 

सभेला उपस्थित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपच्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख करत सांगितले, जालना शहराचा सर्वांगीण विकास, मजबूत पायाभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम प्रशासन ही भाजपची ओळख आहे. येणाऱ्या काळात जालना हे मराठवाड्यातील आदर्श महानगर बनवायचे असेल, तर भाजपलाच संधी द्या. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता भाजपचा विजय निश्चित आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे जालना शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल,

 

माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर म्हणाले, जालना महानगरपालिकेवर भाजपचा महापौर होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपने नेहमीच विकास, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य दिले आहे. जालना शहराला स्वच्छ, सुंदर आणि सक्षम महानगर बनवायचे असेल, तर भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे.

 

 

 

यावेळी निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की, जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी हाच एकमेव सक्षम पर्याय आहे. भाजपने नेहमीच विकासकामांना गती देत सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महानगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिल्यास शहरात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या कामांना वेग मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“भाजपच्या नेतृत्वाखाली जालना शहर नक्कीच मराठवाड्यातील आदर्श महानगर बनेल,” असे सांगत त्यांनी नागरिकांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा. प्रत्येक घराघरात भाजपचे विचार पोहोचवा. तुमचे एक एक मत जालना शहराच्या विकासासाठी आणि मजबूत नेतृत्वासाठी निर्णायक ठरणार आहे. शेवटी त्यांनी नागरिकांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

0000

संबंधित पोस्ट

तालुका शहापूर येथे पारंपरिक, पट्टा व यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांसमवेत केली भात लावणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार !· 4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात 5187 अनुकंपा उमेदवार

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन..

vishwatmaklokswamivarta

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे…