vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची

‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

    अमरावती, प्रतिनिधी: राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अमरावती डाक विभागातर्फे ‘नन्ही मुस्कान, बडी उडान’ विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     या मोहिमेत 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ उघडण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनजागृती करीत आहेत. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी खाते हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पालकांनी मुलीचे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी भरीव पाऊल उचलावे, असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

     या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मुलींचे शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ध्येयाला बल देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा, मुलींच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे आवाहन डाकघरचे प्रवर अधीक्षक पी. ए. गेडाम यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन; महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण …

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

आताची मोठी बातमी -तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना- ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

vishwatmaklokswamivarta