महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा भव्यतम हिरकणी महोत्सव दिवाळीपूर्वी 1 ते 4 नोव्हेंबरला नवी मुंबईत-स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा भव्यतम हिरकणी महोत्सव दिवाळीपूर्वी 1 ते 4 नोव्हेंबरला नवी मुंबईत-स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा भव्यतम हिरकणी महोत्सव दिवाळीपूर्वी 1 ते 4 नोव्हेंबरला नवी मुंबईत-स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध वस्तू व साहित्याची खरेदी होत असते. त्यामुळे याचा लाभ स्थानिक महिला बचत गट व महिला संस्था यांनी बनविलेल्या वस्तू व साहित्याला मिळावा यादृष्टीने नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या माध्यमातून भव्यतम हिरकणी महोत्सवाच्या दिवाळीपूर्वी आयोजन करण्यात आले आहे.
या माध्यमातून महिलांच्या अंगभूत कलागुणांना व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा प्रयत्न असून दि. १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करावे – सेक्टर 26, नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात सकाळी 11.00 ते रात्री 10.00 या वेळेत सदर प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.
हिरकणी महोत्सवाचा शुभारंभ रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी, सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या चार दिवसीय महोत्सवात महिला बचत गटांच्या दर्जेदार घरगुती वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यासोबतच मनोरंजनपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम रूपरेषा :
रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६: सकाळी ११.०० वा. – उद्घाटन सोहळा; संध्याकाळी ७.०० वा. – दीप संध्या गंगा आरती
सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६: संध्या. ६.०० वा. – महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी खुले व्यासपीठ (गायन, वादन, नृत्य व मंगळागौर इ.)
मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६: संध्याकाळी ६.०० वा. – महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर’
बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६: संध्याकाळी ६.०० वा. – महोत्सवाचा भव्य समारोप व पारितोषिक वितरण सोहळा
अशा भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘स्त्री सक्षमीकरणाची ज्योत लावूया, प्रत्येक हाती स्वावलंबनाची पणती देऊया!’ – ही संकल्पना नजरेसमोर ठेवून महिलांच्या स्वावलंबनाला व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईकरांनी या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम.सलुजा सुतार व उपसभापती श्रीम.रूपाली भगत यांच्या वतीने करण्यात