vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कर्जत येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

कर्जत येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास विषयक जनजागृती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, भालिवडी, ता. कर्जत येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

 यावेळी कौटुंबिक हिंसाचार कायदा, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रकल्पांची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. या उपक्रमात सुमारे 550 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमास आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य श्रीमती वैशाली पाटील, संशोधन अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री. अविनाश बदे, चाईल्ड हेल्पलाईनच्या श्रीमती निलाक्षी दगडे, कर्जत तालुका सहाय्यक संरक्षण अधिकारी श्रीमती अस्मिता खंडागळे, पेण प्रकल्पांतर्गत बचत गट, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,एल-निनो प्रभाव व उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा-संस्कारयुक्त शिक्षणातून सक्षम पिढी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी…