vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक

नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक

 

लातूर, प्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुंबई येथील नौदल अधिकारी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला मुंबईहून येणारे नौदल अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, ते माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या, तसेच प्रलंबित प्रश्न जाणून घेणार आहेत. तरी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांनी १९ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

शालेय विद्यार्थ्यांत आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली,व्यसन परावृत्तीबाबत जागृती करणारा संयम उपक्रम- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची संकल्पना- शिक्षक प्रशिक्षणात 600 शिक्षकांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा-जिल्हाधिकारी आंचल गोयल

अदानी युवा सेवा फाउंडेशन धारावीचे आपले सहकारी मित्र विनोद गोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासी शुभेच्छा भेट

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..