vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

काटगाव येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत..

काटगाव येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत..

लातूर प्रतिनिधी-राज्यातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शाळेचा पहिला दिवस उत्सवात रूपांतरित करणे, या उद्देशाने शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा ‘शाळा प्रवेशोत्सव’चा लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी, लातूरचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. याच पार्श्वभूमीवर काटगाव येथील शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अत्यंत आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचे पर्यावरण अधिक समृद्ध आणि हिरवेगार व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश होता. शाळेतील विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण करून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, या अनुषंगाने राज्यभर हा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना देण्याची ‘पहिले पाऊल’ ही अभिनव संकल्पनाही राबविली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात काटगाव येथील शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित बालकांच्या पायाचे ठसे घेण्यात आले.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री. मांदळे, केंद्रप्रमुख वामन राठोड, शिक्षक विजय माळाळे, गोविंद गारकर आणि श्रीमती राजमाले, श्रीमती तांदळे, श्रीमती खंडागळे, श्रीमती लांडगे, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती सय्यद उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारीआपल्या शाळेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देवून या अनुषंगाने शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवावा, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यावेळी म्हणाले.

*****

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सरासरी 37.2 मि.मी. पाऊस

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई महसूलमंत्र्यांचे परिषदेत आश्वासन