vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

        सांगली, प्रतिनिधी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 18 ऑगस्ट 2025 या सात दिवसांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न रावसाहेब समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

   सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करूया- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ▪️मेट्रो, बससेवा, रिंग रोड, मिसिंग लिंक, पूल व रस्ते प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यावर भर▪️वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमणे व डबल पार्किंगच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक वाहतूक समित्या स्थापन होणार▪️सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याला प्राधान्य▪️वाहतूक व्यवस्थेतील समस्या व उपाययोजनांबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे सादरीकरण…

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमस्थळी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी…

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील साखळी बु. गावासाठी टँकर मंजूर

भारतीय रेल्वे बसवणार आधुनिक कंपोझिट स्लीपर्स एआयच्या मदतीने ट्रॅकची देखरेख आणखी सुधारणार

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे