vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन

राज्य प्रतिनिधी-

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाच्या शासननिर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन पात्र व्यक्तिंना मराठा-कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना येणाऱ्या समस्यांबाबत मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ०२४०-२९८८०७७ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावे. त्याबाबत काहीही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’;बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध..

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta