vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

लातूर, प्रतिनिधी: नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ हा भव्य कार्यक्रम येत्या २४ आणि २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

सूक्ष्म नियोजन आणि विविध समित्या  कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. यात बुटांच्या व्यवस्थेपासून ते भोजनापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी ८ ठिकाणी अखंड ‘लंगर’ (महाप्रसाद) सुरू राहतील. तसेच, त्यांच्या निवासाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. यासोबतच शासकीय योजनांचे आणि विविध उद्योजकांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील.

 या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही नांदेडमध्ये येतील. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कडेकोट तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग या कार्यक्रमासाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहत आहे.

 हा कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नाही. यात लबाना, बंजारा,सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल आदींसह आणि इतर सर्व समुदायांचे लोक मोठ्याप्रमाणात सहभागी होत आहेत.

जनतेचे योगदान महत्त्वाचे -आजच्या धावपळीच्या जगात ‘त्याग आणि सेवा’ हीच खरी माणुसकी आहे. हा विचार जपण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जनतेसह देशभरातील जनतेने या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ज्यांना या महायज्ञात सेवा (स्वयंसेवक म्हणून) द्यायची आहे, त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

00000

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

आष्टी विधानसभा मतदारसंघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न 

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.