vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भिवंडीत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष शिबीर संपन्न ,विविध दाखले आणि शासकीय योजनांचा शेकडो नागरिकांना लाभ

भिवंडीत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष शिबीर संपन्न ,विविध दाखले आणि शासकीय योजनांचा शेकडो नागरिकांना लाभ

 

ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी उपविभागीय अधिकारी आणि भिवंडी तहसिलदार कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कामतघर हद्दीतील नारपोली शिवाजी नगर येथील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी एका विशेष दाखले व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

    राहणाळ येथील आगरी उन्नती समाज मंडळ येथे पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

     या शिबिरास निवासी नायब तहसिलदार विशाल इंदुलकर, माजी सरपंच राजेंद्र मढवी, ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदू भाऊ पवार, सामाजिक कार्यकर्त्या इंदुबाई चव्हाण, सरपंच प्रताप पाटील, मंडळ अधिकारी योगेश भोजने, सुरेश राठोड, अविनाश राऊत आणि राहणाळच्या ग्राम महसूल अधिकारी संजीवनी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये ३५ उत्पन्नाचे दाखले, ३६ अधिवास व रहिवासी प्रमाणपत्रे, २ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे आणि ५ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच २१ नागरिकांनी आधार नोंदणी व दुरुस्तीचा लाभ घेतला.

     आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत ४९ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय ४६ आभा कार्ड, २९ आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले.

     श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे १० आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १० अर्ज मंजूर करण्यात आले.

    या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांच्या वतीने तब्बल १५० लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

      जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपविभागीय अधिकारी अमित सानप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेतू केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग आणि पुरवठा विभाग यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे हे शिबीर सुरळीत व यशस्वीपणे पार पडले,अशी माहिती तहसिलदार अभिजीत खोले यांनी दिली.

00000000000

संबंधित पोस्ट

२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर· चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनयविश्वातील एक अजरामर पर्व हरपले-आ. सुधीर मुनगंटीवारतीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीने गौरवलेला असामान्य कलावंत; ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ पासून ‘नटसम्राट’पर्यंत अजरामर भूमिका

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

करजगीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची दिली होती ग्वाही- उमदी पोलिस ठाण्याच्या तपासाला यश..