vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये विशेष शिबीर संपन्न;५१४ नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधांचा लाभ

सेवा संकल्प-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये विशेष शिबीर संपन्न;५१४ नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधांचा लाभ

ठाणे,द प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियाना’अंतर्गत उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियाना’चे विशेष आयोजन करण्यात आले.

     विठ्ठलवाडी, उल्हासनगर-३ येथील गोपाळ समाज मंदिर, शांतीनगर येथे पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून एकूण ५१४ लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व आरोग्यविषयक सुविधांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.

     हे विशेष शिबीर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसिलदार कल्याणी कदम-मोहिते यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक महसूल अधिकारी व विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडले.

    शिबिरादरम्यान नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये १२९ नागरिकांना जातीचे दाखले, २२ नागरिकांना अधिवास दाखले, १२ नागरिकांना रहिवास दाखले, ६ नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, ८ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आणि ३ नागरिकांना वयाचे दाखले वितरित करण्यात आले.

     तसेच महसूल विभागाशी संबंधित नमुना ६, ७, ८ ची ४० कामे पूर्ण करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुविधांच्या अंतर्गत ७० नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड आणि ८० नागरिकांना आभा कार्ड देण्यात आले, तर १५ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

     याशिवाय शिधावाटप कार्यालयामार्फत २३ नागरिकांना, सांगायो (संजय गांधी निराधार योजना) विभागामार्फत ४ नागरिकांना सेवा पुरवण्यात आल्या, तसेच १६ नागरिकांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती पूर्ण झाली.

      तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांच्या वतीने तब्बल ८६ नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार विषयांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

      महसूल, सेतू केंद्र, आरोग्य आणि पुरवठा विभागांच्या प्रभावी समन्वयामुळे या विशेष शिबिरातून भटक्या व विमुक्त जमातीतील नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळून शिबीर अत्यंत यशस्वी ठरले.

0000000000

संबंधित पोस्ट

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत;*वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपायोजना*

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन