vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू..

राज्य प्रतिनिधी

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये एक मोठी दुर्घटना- लष्कराचे एक वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात तब्बल 10 जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहनामध्ये 21 जवान होते. त्यापैकी 11 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उधमपूर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा अपघात भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय रस्त्यावरील खन्नी टॉप येथे झाला. सर्व जवान एका वरच्या भागात असलेल्या चौकीकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. डोडामध्ये झालेल्या दुर्घटनेत आपण आपल्या देशाचे 10 जवान गमावले आहेत, या घटनेमुळे खूप दु:ख झाले. आम्ही सैन्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला कायम लक्षात ठेवू, अशा या संकट काळात संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत, तर दहा जाण गंभीर जखमी झाले आहेत, जखमी जवानांना एअरलिफ्ट करून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांना उपचारासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे मनोज सिन्हा यांनी म्हटले.

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर· जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र· दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे क‌ाँग्रेस कडून निषेध  राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते’ – विक्रांत चव्हाण 

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta