vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची अंतर्गत जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक समाजाच्या इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन.कराड यांनी केले आहे.

महामंडळाला प्राप्त झालेली योजनानिहाय अनुदान योजना-०४,बीजभांडवल योजना-०४,थेट कर्ज योजना (रु. १ लक्ष पर्यंत) ०८ एनएसएफडीसी टर्म लोन योजना- ०४,एनएसएफडीसी सुक्ष्म पुरवठा योजना-०२ एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना- ०२ असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत’डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर’ येथील जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

प्राप्त अर्जांची संख्या निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त असल्यास, पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय रँडमायझेशन(Randomization) प्रणालीद्वारे किंवा लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेत ज्या अर्जदारांची निवड होणार नाही, त्यांचे अर्ज रद्द करण्यात येतील, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

अहमदाबाद विमान दुर्घटनेत  एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन-सुमित सभरवालांच्या 85 वर्षीय पित्याकडून अखेरचा निरोप

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta