vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

सातारा प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही. हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही, वेळ व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए.एस. वाघमारे सारे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

महाराष्ट्रधर्म वाढवुया… मराठीची गुढी उंच उभी करुया..!

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…