vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

       अमरावती, प्रतिनिधी: नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना नामांकित खासगी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 24 मार्च 2026 रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) ही नामांकित कंपनी या मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांची निवड करणार आहे.

    स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. टीसीएस कंपनीला आवश्यक असणाऱ्या विविध पात्रतेच्या पदांसाठी कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेतील. विशेष म्हणजे, मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना या मेळाव्यातून रोजगार मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

     या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्यूआर कोडस्कॅन करून आपली ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर प्राप्त होणाऱ्या ‘Registration Slip’ ची प्रिंट सोबत ठेवावी. मेळाव्याच्या दिवशी, म्हणजेच 24 मार्च रोजी सकाळी, स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

     नोंदणीबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयाच्या ०७२१-२५६६०६६ किंवा ८९८३२८८९८२ या क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली यो. बारस्कर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष;जिल्हाधिकाऱ्यांची साहित्यिकांना सादभरपूर वाचनानंतरच लेखनाकडे वळावे: संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे

vishwatmaklokswamivarta

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

vishwatmaklokswamivarta

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

vishwatmaklokswamivarta

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे