vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

         अमरावती, प्रतिनिधी): अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र, नांदगाव पेठ येथे नव्याने विकसित होत असलेल्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ला आज भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी भेट देऊन पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होणाऱ्या टेक्सटाईल पार्क्सपैकी अमरावती येथील पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव मा. डॉ. पी अन्बलगन, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती.

     यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. एकूण 1 हजार 20 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या पार्कमध्ये रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, केबलिंग, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात 100 एकर क्षेत्रावर एमआयडीसीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पात नेदरलँडमधील ‘मेसर्स टिटिवायएम मॅनेजमेंट बी.व्ही.’ या कंपनीद्वारे कापूस प्रक्रिया आणि संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासाठी 66 एकर जमिनीवर पहिली परकीय गुंतवणूक करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

      दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील एकूण औद्योगिक विकास आणि या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधींविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग संचालक अनिल कुमार, सहसंचालक विनय मिश्रा आणि नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये एमआयडीसी नागपूरचे मुख्य राजेश झंझाड यांनी आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड**पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रीय पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

बांधकाम विषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडून 1.40 कोटीहून अधिक दंडवसूली-नोटीशीची दखल न घेणाऱ्या विकासकांवर काम बंद करण्याबाबतची होणार कडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य