vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर,विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ 

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर,विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ

राज्य प्रतिनिधी-राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री बाबासाहेब पाटील* अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण* शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन* न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन