vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विश्वविजय महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री यांच्याकडून अभिनंदन

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विश्वविजय महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, प्रतिनिधी: संपूर्ण देशभरात भारतीय नागरिक तिरंगा हातात घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंद साजरा करत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विश्वकप विजेत्या महिला क्रिकेट चमूला शुभेच्छा दिल्या

राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, “संधी मिळाली तर भारतीय मुली जग जिंकू शकतात, हे आपल्या महिला खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे.”

‘क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम’ ही संकल्पना आज आपल्या रणरागिणींनी मोडीत काढली, असे सांगत ते म्हणाले की या विजयी महिलांनी जगाला दाखवून दिलं की जेंटलवूमन मध्ये देखील क्षमता, गुणवत्ता आणि संघर्षपूर्ण समानता आहे.

भारतीय स्त्रिया आता चूल आणि मूल यापलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या नव्या सीमारेषा गाठत आहेत. महिला क्रिकेट संघाच्या या विजयाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भारतीय मुली कोणत्याही अर्थाने मुलांपेक्षा कमी नाहीत . त्या अधिक जिद्दी, जाज्वल्य आणि समर्थ आहेत, असेही क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले.

 

0000

संबंधित पोस्ट

राजधानीत सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत