vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

*महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

 

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावे. त्याचबरोबर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या खाण, पोलाद व इतर उद्योगांच्या गरजेनुसार स्थानिक युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करणे ही प्रशासनाची प्रमुख प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार उषा चौधरी, माविमचे व लोकसंचालित साधन केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले की, स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. या दृष्टीने प्रशासनाने कृषीपूरक व स्थानिक उत्पादनांवर आधारित रोजगार क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन केले असून, शिंगाडा उत्पादन, चारोळी प्रक्रिया तसेच बारदाना निर्मिती यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.

गडचिरोली हा भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा जिल्हा असल्याने भाताशी निगडित उद्योगांना मोठी संधी उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर माविमच्या समन्वयातून बारदाना निर्मिती प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आरमोरी येथील लोकसंचालित साधन केंद्राने महिलांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वीपणे उभारला असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महिला बचत गट, लोकसंचालित साधन केंद्र आणि माविमच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या उपक्रमांमुळे महिलांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असून, प्रकल्पांची उत्पादकता, बाजारपेठेतील मागणी आणि विस्ताराच्या संधींचा अभ्यास करून भविष्यात अशा रोजगार क्लस्टरची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिकाधिक महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी व युवक-युवतींसाठी उद्योगाभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यावर प्रशासन विशेष भर देत आहे. स्थानिक युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत रोजगाराच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी केले.

कार्यक्रमात माविमच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान-मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला प्रतिएकर किमान १ कोटी रुपये दर व चौपट भरपाईची मागणी; पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाकडे कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले

vishwatmaklokswamivarta