vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

रायगड- प्रतिनिधी प्रतिनिधी:- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत करण्यात येणार असून त्यामध्ये वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन) असे उपक्रम आहेत. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी दि.28 ऑक्टोबर 2025 सायं.5 वाजेपर्यंत dsoraigad.२००९@rediffmail.com, द्वारे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड प्रकाश वाघ यांनी केले आहे.

युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार करते. राज्यात सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक चे आयोजन दि.10 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, येथे संपर्क साधावा

संबंधित पोस्ट

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे 18 नोव्हेंबर 2025 पासूनमीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु…

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ* 

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

vishwatmaklokswamivarta