vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

मुंबई, प्रतिनिधी : यश विद्यानिकेतन या वसई येथील शैक्षणिक संस्थेने शासनाची परवानगी न घेता शाळेचे स्थलांतर केल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणी संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. तसेच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत क्षेत्रभेट न देता शाळांची नोंदणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत यश विद्यानिकेतन ग्लोबल शाळेतील आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासंदर्भात सदस्य राजन नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी सदस्य प्रशांत बंब आणि प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले.

मंत्री भुसे म्हणाले की, वसईतील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देऊन त्यांना न्याय देण्यात येईल. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी विद्यानिकेतन ग्लोबल शाळा किंवा परिसरातील शाळेची क्षेत्रीय भेट न घेता शाळेची नोंद केल्याचे निदर्शनात आले आहे. गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वसई, संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) व संबंधित केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले

सदरची शाळा शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित करण्यात आली असून याप्रकरणी संबंधित संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वसईतील संबंधित शाळेत आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना त्यांनी ऑनलाइन निवडलेल्या दहा शाळांपैकी रिक्त जागांवर प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही मंत्री दादाजी भुसे यांनी दिदिली.0

0000

 

संबंधित पोस्ट

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

📢 महत्वाची सूचना – किल्ले रायगडावर पायरी मार्ग बंद!

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली – उपमुख्यमंत्री

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर