vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत- मंत्री नितेश राणे

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत- मंत्री नितेश राणे

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून १५ ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

यापूर्वी राज्याच्या जलधी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी होती. पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी मासेमारी रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समिती तसेच राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. या समित्यांनीही बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा अभिप्राय दिला.

शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल. तसेच माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानीही टाळता येणार आहे.

दरम्यान, राज्यात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत आयोजित पूर्वांचल महोत्सव माटी ९ या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मान्यवर उपस्थित होते

निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना घरकुल मंजूर-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

vishwatmaklokswamivarta

जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन ६४ वा जैन दीक्षा समारंभ

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे