vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासाठी लोकचळवळ आवश्यक- गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासाठी लोकचळवळ आवश्यक- गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

        सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. आता गोमय मूल्यवर्धित उत्पादनांचे मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण स्थान लक्षात घेऊन गोसंरक्षणाच्या चळवळीला अधिक चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठीच गोमातेला ‘राष्ट्रमाता’ हा सर्वोच्च दर्जा मिळवून देण्यासाठी संवादस्नेही लोकचळवळ व्यापक करून जनप्रबोधन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे सांगलीत उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. मुंदडा बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी, श्री गणपती पंचायतनचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेखर मुंदडा यांनी स्पष्ट केले की, गोमातेचे व गोमय (शेण-मूत्र) उत्पादनांचे मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेतील स्थान अनन्यसाधारण आहे. या उत्पादनांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना व पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच गोवंश रक्षणाची चळवळ घराघरांत पोहोचवणे हा या संवाद यात्रेचा मुख्य उद्देश आहे.’संवाद यात्रा’ ठरतेय प्रभावी माध्यम

पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या या संयुक्त पुढाकारामुळे संपूर्ण राज्यात गोवंश संगोपन आणि संरक्षणाविषयी जनजागृती केली जात आहे. सांगलीत यात्रेचे आगमन झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी व गोप्रेमींनी याचे स्वागत केले. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने या लोकचळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आल

जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा महाराष्ट्रातील एकूण प्रवास, गोसंरक्षण व संवर्धनासाठी आयोगाकडून होत असलेले विधायक प्रयत्न व गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा मिळावा, यासाठी होत असलेले प्रबोधन, याबद्दल गौरवोद्गार काढले व यात्रेस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी, लोकप्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त करुन महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या गोसंरक्षणार्थ करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक करुन यात्रेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सभापती सावित्री रवि तमनगौडा पाटील, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (कोल्हापूर) डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (सांगली) डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (सातारा) डॉ. दिनकर बोर्डे, माजी आमदार नितीन शिंदे, पशुसंवर्धन नोडल अधिकारी डॉ. सॅम लुद्रीक, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे श्री. भिडे गुरुजी, गुरुराज पोतनीस, भाऊराव कुदळे, संवाद यात्रा कार्यक्रम संयोजक नितेश ओझा, गोशाळा प्रतिनिधी डॉ. पुष्पनाथ चौघुले, स्वामी अमृतानंद, महाएनजीओ प्रतिनिधी, सांगली अशोक पोतनीस, गोशाळा महासंघ प्रतिनिधी अमेय थावले, महिला गोभक्त सांगली जिल्हा सौ. शर्वरी कुलकर्णी आदी उपस्थित होते

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य डॉ. सुनील सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन नितीन ओझा यांनी केले. जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र 

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta