vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

            सांगली, प्रतिनिधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बी.ओ.आय. स्टार सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे 31 दिवस मोफत महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

            ग्रामीण भागातील युवतींना, महिलांना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवतींचे, महिलांचे उत्पत्र वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवतीना, महिलांना बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन चे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासह शिकवला गेला तसेच व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विपणन व्यवस्थापन, विविध शासकीय योजनेबाबत माहिती आणि मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमासाठी आरसेटी संचालक महेश पाटील, प्रशिक्षिका अर्चना पोतदार, आरसेटी चे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आरसेटी संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रम फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, टू व्हिलर मेकॅनिक वर्क, घरगुती (हाउस) वायरिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, आग प्रतिबंधक सुरक्षा अलार्मची सेवा आणि सव्हिसिंग आणि मशरूम / अळंबी लागवड या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जावू नये –

vishwatmaklokswamivarta

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

ध्वजदिन निधीसाठी रुपये 5 लाख मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर